सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत मुक्ताबाई

Muktabai Banner

परिचय

परमात्मा विठ्ठलाचे निःस्सिम भक्त असणारे दांपत्य रुक्मिणीबाई व श्री विठ्ठलपंत कुलकर्णी यांची कन्या व निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव या अलौकिक भावंडाची एकुलती एक भगिनी म्हणजेच मुक्ताबाई ! योगसम्राज्ञी, चितकला मुक्ताबाईंचा जन्म शके १२०१, प्रमाथि संवत्सर, आश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार रोजी सन १२७९ मध्ये झाला. अगदी लहान वयातच या भावंडांच्या वाट्याला अनाथपण व उपेक्षांचे जीवन आले होते व समाजातील लोकांकडून देखील प्रचंड मानसिक क्लेश व हेटाळणी मिळाली होती. मात्र एकमेकांच्या सोबतीने प्रत्येक अवघड प्रसंग निभावून नेण्याची ताकत त्यांना लाभली होती. मुक्ताईला असामान्य बुद्धिमत्ता लाभली होती. लहान असूनही प्रसंगी ती आपल्या वडील बंधूंची आईसमान काळजी घ्यायची. भ्रमित बुद्धी झालेल्या व आत्मसमाधानाचा अभाव असलेल्या १४०० वर्षे वयोमान असलेल्या चांगदेव महाराजांची ती गुरू बनली व त्यांना "चांगदेव पासष्टीचा" अर्थ उलगडून सांगितला. महाराष्ट्र प्रांताला अमूल्य अशी वारकरी संप्रदायाची परंपरा लाभली आहे. त्यामध्ये अनेक अशा स्त्रीसंत देखील लाभल्या आहेत,ज्यांनी आपल्या भक्तीचा ठसा आजतागायत उमटवलेला आहे. त्यामध्ये मुक्ताईचे नाव देखील खूपच आदराने घेतले जाते. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर मोठे बंधू निवृत्तीनाथ मुक्ताईला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. १२ मे १२९७ रोजी ती दोघे तापी नदीजवळ पोचले असता अचानक वीज कडाडली व त्या प्रचंड विजेच्या प्रवाहात मुक्ताई क्षणात लुप्त झाल्या.. मुक्ताईची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे

मुक्ताबाई कथा १
मुक्ताबाई कथा २
मुक्ताबाई कथा ३
मुक्ताबाई कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते