सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री एकनाथ

Eknath Banner

परिचय

एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील एक संत म्हणून ओळखले जातात. नाथमहाराजांचा जन्म पैठण येथील सुर्यनारायण व रुक्मिणी यांच्या घरी १५३३ साली झाला मात्र आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ मिळाला नाही. त्यांचे पालनपोषण त्यांचे आजी-आजोबा चक्रनारायण व सरस्वती यांनी केले. संत भानुदास हे नाथमहाराजांचे पणजोबा होते. ते नित्य सूर्याची उपासना करीत असत. पैठण जवळील वैजापूर येथील गिरीजा हिच्याशी नाथांचा विवाह झाला. या दाम्पत्याला गोदावरी, गंगा व हरी अशी तीन अपत्ये झाली. आपल्या वडिलांकडेच शिष्यत्व पत्करून हरीने ज्ञान मिळवले व पुढे हरिपंडित झाला. २६  फेब्रुवारी १५९९, फाल्गुन वद्य षष्ठी यादिवशी एकनाथांनी समाधी घेतली. हा दिवस ‘एकनाथ षष्ठी’ म्हणूनही ओळखला जातो. नाथांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पादुका नित्यनेमाने आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास हरिपंडितांनी सूरवात केली

एकनाथ कथा १
एकनाथ कथा २
एकनाथ कथा ३
एकनाथ कथा ४
एकनाथ कथा ५
एकनाथ कथा ७
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते