सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री गाडगे महाराज

Gadge Maharaj Banner

परिचय

अमरावती येथील शेणगाव येथे गाडगे महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचे वडील व्यवसायाने परीट होते. गाडगे महाराजांचे बालपण त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजेच त्यांचे आजोळगाव  मूर्तिजापूर येथील दापुरे याठिकाणी गेले. त्यांचा मामा मोठा तालेवार होता व त्याची बरीच मोठी शेतीभाती होती. गाडगेबाबांना लहानपणापासूनच शेती करायला व गाईगुरांची निगराणी राखायला मनापासून आवडत असे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून सन्यास स्वीकारला .अनेक ठिकाणी भ्रमण व तीर्थाटन केले. त्यांनी लोकसेवेचे व्रत स्वीकारून पूर्ण केले. लोकांच्या अडीअडचणीला धावून गेले. गरजूंना मदत करून परत कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे .!

मिश्किल पण उपदेशात्मक संवादाने ते समोरच्या व्यक्तीच्या मनातली अंधश्रद्धा दूर करीत. सार्वजनिक स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयीची शिकवण समाजात रुजवण्यासाठी त्यांनी "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे स्वतः ते या कार्यात सक्रिय राहिले. ते हातामध्ये एक खराटा सतत बाळगत असत व ज्याही गावी जात तिथला परिसर स्वतः स्वच्छ करीत व कसलीही अपेक्षा न बाळगता तिथून निघून जात. अंगावर गोधडीवजा फाटकी तुटकी वस्त्रे आणि हातामध्ये एक फुटके गाडगे,असा त्यांचा वेष असे ;यामुळेच लोक त्यांना "गाडगेबाबा" म्हणत...त्याचप्रमाणे गोधडेबाबा ,चिंधे बाबा,लोटके बाबा याही नावांनी ते जनमानसात प्रसिद्ध होते. अंधश्रद्धा ,अज्ञान ,अनिष्ट रूढी-परंपरा याविषयीची जनजागृती ते आपल्या कीर्तनाद्वारे करीत असत. चोरी करू नका ,कर्ज काढू नका ,व्यसने करू नका ,देवाधर्माच्या नावाने मुक्या जनावरांचा बळी देऊ नका , अस्पृश्यता  पाळू नका, स्वच्छता राखा. तसेच देव दगडधोंड्यात नाही तर माणसात आहे ....या आणि अश्या अनेक उपदेशांनी ते समाज प्रबोधन करीत असत. २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथील वलगाव येथे त्यांचे निर्वाण झाले. अमरावती मध्ये त्यांचे स्मारक आहे

गाडगे महाराज कथा १
गाडगे महाराज कथा २
गाडगे महाराज कथा ३
गाडगे महाराज कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते