सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री चोखामेळा

Chokhamela Banner

परिचय

संत चोखामेळा यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुण किंवा मेहुणपूरा येथे झाला असे मानले जाते. संत नामदेव हे चोखोबारायांचे गुरू होते व त्यांच्या संतमेळ्यातील एक वारकरी संतकवी होते. ते जातीने महार होते, त्यावेळच्या सामाजिक व जातीय भेदभावामुळे चोखोबांना मानहानी व अपमान सहन करावे लागले. स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीच या गोष्टीमुळे त्यांना फार मानसिक त्रास होत असे. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते व सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असत, मात्र पंढरपूरात विठ्ठलाच्या या साजऱ्या-सावळ्या रुपाला मी महाद्वारातूनच फक्त पाहू शकतो, त्याला उराउरी भेटू शकत नाही, सर्वजण भगवंताची लेकरं आहेत तर आपल्याच बाबतीत हा भेदभाव का? मंदिराच्या आत प्रवेश करू शकत नाही याची त्यांना खूप मोठी खंत होती. प्रपंचासाठी चोखोबा मोलमजुरी करीत असत. मंगळवेढा येथील गावकुसाच्या कामात बांधकाम कोसळून अनेक मजूर त्यात मारले गेले. त्यामध्ये चोखोबा यांचाही मृत्यू झाला. बांधकाम कोसळून मयत झालेल्या मजुरांच्या हाडामासांचा तिथे चिखल झाला होता. त्यातील संत चोखोबांची हाडे नक्की कोणती? हा प्रश्न निर्माण झाला. यातील काही हाडांमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. संत नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली. चोखोबाच्या ३५० अभंग रचना सध्या उपलब्ध आहेत, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा ,वेदना ,उपेक्षा,मानसिक छळ यांचे पडसाद त्यांच्या या रचनांवर दिसून येतात व हृदयाला भिडतात. संत चोखोबांचा संपूर्ण परिवार हा विठ्ठल भक्त होता. चोखोबांच्या पत्नी, मुलगा कर्ममेळा, बहिण निर्मळाबाई व बहिणीचे पती बंका या सर्वांनीच विठ्ठलभक्तीवर अभंग लिहिले आहेत. हे अभंग आजही उपलब्ध आहेत

चोखामेळा कथा १
चोखामेळा कथा २
चोखामेळा कथा ३
चोखामेळा कथा ४
चोखामेळा कथा ५
चोखामेळा कथा ६
चोखामेळा कथा ७
चोखामेळा कथा ८
कान्होपात्रा कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते