सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री ज्ञानेश्वर

Dnyaneshwar Banner

परिचय

श्री संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके ११९७, युवानाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी गुरुवार रोजी सन १२७५ मध्ये झाला. पैठणमधील आपेगाव हे त्यांचे मूळ गाव.  रखुमाई व विठ्ठलपंत  कुलकर्णी हे आई-वडील व निवृत्ती ,सोपान व मुक्ताबाई  ही त्यांची भावंडे !  ज्ञानेश्वर महाराजानी त्यांच्या लहान वयातच अलौकिक अश्या ग्रंथांची निर्मिती केली. भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग गाथा व हरिपाठ हे ग्रंथ त्यांनी प्राकृत मराठी भाषेत व जनसामान्य लोकांना देखील अगदी सहजपणे समजेल अशा सहज व रसाळ भाषेत लिहिले.

"माझ्या मराठीची बोलू कौतुके ! परि अमृतातेही पैजा जिंके ।"

"ऐसे अक्षरे रसिके मेळवीन ।!

अमृतापेक्षाही गोड अशी मराठी भाषा, असा उल्लेख करीत ज्ञानेश्वर महाराज आपल्या मराठी भाषेविषयीचा अभिमान व महती व्यक्त करतात. पुण्याजवळील आळंदी याठिकाणी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य १३, शके १२१८ म्हणजेच सन १२९६ मध्ये संजिवन समाधी घेतली. या क्षेत्राला देवाची आळंदी असेही संबोधले जाते.

"जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात हे।"

समस्त जगाची जणू काळजी वाहणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायात व इतर जनमानसात देखील "माऊली "असे मोठ्या प्रेमाने संबोधले जाते

ज्ञानेश्वर कथा १
ज्ञानेश्वर कथा २
ज्ञानेश्वर कथा ३
ज्ञानेश्वर कथा ४
ज्ञानेश्वर कथा ५
ज्ञानेश्वर कथा ६
ज्ञानेश्वर कथा ७
ज्ञानेश्वर कथा ८
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते