सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री तुकाराम

Tukaram Banner

परिचय

पुण्याजवळील देहू या गावी १५९८ मध्ये वसंतपंचमी/ माघ शुद्ध पंचमीला  तुकाराम महाराजांचा जन्म झाला. वडील बोल्होबा आंबिले, आई कणकाई व पत्नी आवली असा त्यांचा परिवार होता. पंढरपूरचा विठोबा म्हणजे तुकोबांचे परमदैवत. विठूनांमाच्या नामस्मरणात, अभंग गायन व कीर्तनांमध्ये ते तल्लीन होऊन जातं. त्यांना त्यांचे गुरू बाबाजी चैतन्य यांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानप्राप्ती झाली होती. तुकोबांनी पाच हजारांपेक्षा अधिक अभंग रचना असणारा "तुकारामाची गाथा" हा ग्रंथ रचला. तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक मुख्य वारकरी संत होते. वारकरी त्यांचा उल्लेख जगद्गुरू असा करतात तसेच प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी  "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज की जय" असा जल्लोष करतात. देहू गावामध्ये इंद्रायणी नदीकाठी नांदूरकीचा एक वृक्ष आहे. याच वृक्षाखाली उभे राहून दुपारी  बारा वाजण्याच्या सुमारास तुकोबांनी आपले कीर्तन केले व याच ठिकाणाहून त्यांनी सदेह वैकुंठगमन केले. होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या या दिवसाला "तुकाराम बीज"असे म्हटले जाते व आजही याच दिवशी, याच वेळेला हा दिवस वारकरी व भक्तांकडून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. अशी आख्यायिका आहे की, तुकाराम बीजेच्या दिवशी बरोबर दुपारी बाराच्या सुमारास हा नांदूरकीचा वृक्ष आपोआप हलतो. हे दृश्य पाहण्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात

तुकाराम कथा १
तुकाराम कथा २
तुकाराम कथा ३
तुकाराम कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते