सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री दामाजीपंत

Damajipant Banner

परिचय

दामाजीपंत यांचा जन्म मंगळवेढा येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. पंढरीचा विठोबा त्यांचे परमदैवत होते. बिदर येथील महंमदशाहच्या सैन्यामध्ये ते सेनापती होते. अब्दुलशाहशी झालेल्या लढाईमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार हे पद बहाल करण्यात आले तसेच पुढे काही काळाने ते मंगळवेढ्याचे मामलेदार झाले. स्वतःमधील अंगभूत हुशारीमुळे त्यांना ही पदे मिळत गेली. मंगळवेढयामध्ये १३७६, १३७७ व १३७८ साली लागोपाठ भीषण दुष्काळ पडला. एकापाठोपाठ एक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे सामान्य जनता पुरेपूर हवालदिल झाली व त्यांचे जगणे व उदरभरण होणे देखील मुश्कील झाले. दामाजीपंतांनी धान्याची दोन मोठी कोठारे बांधलेली होती. दुष्काळामुळे लोकांची झालेली वाईट अवस्था पाहून दामाजीपंतांनी ती दोन्ही धान्य कोठारे लोकांसाठी खुली केली. त्यांची ही कृती बादशाहला अजिबातच आवडली नाही व त्याने दामाजीपंत याना अटक करून बिदर येथे आणण्यास सैनिकांना पाठवले. त्याविषयीची दंतकथा अशी आहे की,या प्रवासादरम्यान प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दामाजीपंत यांचा नोकर विठू महार याचे रूप घेऊन सव्वा लाख सोन्याच्या मोहरा बादशाहला देऊन त्याची पोचपावती घेतली व ती  दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. यानंतर दामाजीपंत यांची सुटका झाली व यथोचित सत्कार देखील झाला. दामाजीपंतांचा मृत्यू १३८२ मध्ये झाला. सुरुवातीला अगदी साध्या स्वरूपात त्यांची समाधी बांधण्यात आली होती मात्र नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी त्याजागी घुमटावजा मंदिर बांधले व त्यात विठ्ठल-रखुमाई व दामाजीपंत यांच्या मुर्ती स्थापित केल्या

दामाजीपंत कथा १
दामाजीपंत कथा २
दामाजीपंत कथा ३
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते