Azadi Ka Mahotsav Logo
Maharashtra Forest Department Logo

सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री नरहरी सोनार

Narhari Sonar Banner

परिचय

श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूरमध्ये इ स १११५ साली श्रावण मासात शुक्ल पक्ष त्रयोदशीला अनुराधा नक्षत्रावर बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला. त्यांच्या नामकरण सोहळ्याला चौदाशे वर्षांचे आयुर्मान लाभलेले  व आपल्या योगसमर्थ्याच्या बळावर मोठी सिद्धी व शक्ती प्राप्त करणारे महान योगी चांगदेव महाराज हे उपस्थित होते व त्यांनीच या बालकाचे 'नरहरी' असे नामकरण केले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा यज्ञोपवीत उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडून गुरुउपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा व गायत्री मंत्राची प्राप्ती झाली. वयवर्षे १८ ते २० च्या दरम्यान गंगाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांचे सुखी संपन्न प्रापंचिक जीवन सुरू झाले. नरहरीं महाराज व्यवसायाने सोनार होते व अतिशय सुंदर कलाकुसरीच्या दागिने घडणावळीसाठी ते पंढरपूरात प्रसिद्ध होते. या व्यवसायामध्ये त्यांचा खूप चांगला नावलौकिक होता. नरहरींच्या घराण्यामध्ये पिढ्यान् पिढ्या महादेवाची भक्ती व उपासना होत आली होती व स्वतः नरहरी देखील कट्टर शिवभक्त होते. भल्या पहाटे नित्यनेमाने  महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रे वाहून ते शिव आराधना करीत. पंढरपूरातील रहिवासी देखील त्यांच्या या भक्तीविषयी जाणून होते.. चरित्रकार धुंडिराज मालू यांनी संत नरहरी सोनार यांच्याविषयी लिहिलेल्या माहितीनुसार ते महादेवाशिवाय अन्य कुठल्याही देवतेचे मुखही पाहत नसत मात्र शिव व विठ्ठल एकच आहेत व ते एकमेकांच्या ठायी सामावलेले आहेत हे एका प्रसंगाने त्यांना ज्ञात झाले व ते विठ्ठलाचे परमभक्त झाले

नरहरी सोनार कथा १
नरहरी सोनार कथा २
नरहरी सोनार कथा ३
नरहरी सोनार कथा ४
Scroll to Top
Pudina Tulas

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

Pudina Tulas

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

Lemon Tulas

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

Hanuman Tulas

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

Sabja Tulas

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

Vaijayant Tulas

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

Krishna Tulas

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

Ram Tulas

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते