सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री निवृत्तीनाथ

Nivruttinath Maharaj Banner

परिचय

आळंदी  येथील भगवद्भक्त दांपत्य रुक्मिणी व श्री विठ्ठलपंत कुलकर्णी  यांचे निवृत्तीनाथ हे पहिले अपत्य, अभ्यासकांच्या मते शके ११९५, श्रीमुख नामसंवत्सर, माघ वद्य प्रतिपदा सोमवार रोजी सन १२७३ मध्ये त्यांचा  जन्म झाला असावा. श्री ज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव महाराज व मुक्तबाई यांचे ते वडील बंधू होते. या भावंडांच्या अगदी लहान वयातच त्यांच्या माता-पित्याने देहत्याग केला होता. या चारही भावंडांना समाजाकडून मोठी अपमानास्पद वागणूक मिळत होती. हालअपेष्टा आणि हेटाळणी ही नित्याचीच होती. मात्र ही भांवडे सदैव एकमेकांच्या सहवासात व एकोप्याने राहिली. निवृत्तीनाथांनी योग व कृष्णभक्ती यांनी परिपूर्ण अशा तीनशेपेक्षा अधिक अभंगरचना केल्या. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरमहाराजांचे मार्गदर्शक होते. गहिनीनाथ महाराज हे निवृत्तीनाथांना गुरू म्हणून लाभले होते. त्यांच्याकडून त्यांना योगसिद्धी प्राप्त झाल्या होत्या व त्यांचा उपयोग जनकल्याणासाठी करावा असेही त्यांच्या गुरूंनी त्यांना सूचित केले होते. ज्ञानदेवमहाराज, सोपानदेव आणि मुक्ताई यांनी घेतलेल्या समाधीनंतर निवृत्तीनाथ महाराजांनी १७ जून १२९७ रोजी (ज्येष्ठ कृ द्वादशी) त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. १८१२ मध्ये या समाधीवर मंदिर बांधण्यात आले. या मंदिरामध्ये निवृत्तीनाथांची मूळ समाधी व विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद् गुरू श्री निवृत्तीनाथांचे हे मंदिर वारकरी संप्रदायातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे

निवृत्तीनाथ कथा १
निवृत्तीनाथ कथा २
निवृत्तीनाथ कथा ३
निवृत्तीनाथ कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते