सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री रोहिदास

Rohidas Banner

परिचय

उत्तर प्रदेशातील काशी शहराच्या जवळ असलेल्या मांडूर याठिकाणी १४५० साली श्री संत रोहिदास यांचा जन्म झाला असावा असे अभ्यासकांच्या मते सांगण्यात येते. त्यांच्या आई-वडिलांचे नाव रघु आणि कालसी होते.त्यांचे वडील व्यवसायाने चर्मकार होते. त्यांचे कुटुंब चामडे कमावण्याच्या व्यवसायात असल्याने त्यांना अस्पृश्य समजले जायचे. संत रोहिदासांचा कल मात्र अध्यात्मिक जीवनाकडे अधिक होता ,त्यांचा बहुतांश वेळ गंगा नदीच्या किनारी जात असे. संतकवी ,समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरू अशी त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कविता लेखन केले. त्यांच्या प्रत्येक कवितेमधून त्यांनी विविध सामाजिक गोष्टीवर भाष्य केले आहे उदा. संघर्ष आणि अत्याचार, युद्ध आणि निराकरण,वैराग्य आणि योगी जीवन! तसेच आपले जीवन योग्य कारणासाठी उपयोगी पडावे अशी त्यांची जीवनाप्रति असणारी इच्छा दिसून यायची! त्यांच्या ४१ कवितांचा समावेश शिखांच्या पवित्र गुरुग्रंथसाहेब या धर्मग्रंथामध्ये केला गेलेला आहे. साधारण १५ व्या ते १६ व्या शतकादरम्यान ते भारतीयभक्ती चळवळीतील महत्वाचे संतकवी होते.त्यांच्या भक्तीगीतांचा प्रभाव पंजाब ,उत्तरप्रदेश, राजस्थान ,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या प्रांतातील जनमानसांवर फार होता. संत रोहिदासांनी आंध्रप्रदेश ,महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश इ ठिकाणी तीर्थाटन केले. प्रादेशिक भाषांमधील त्यांची काव्य-भजने खूप लोकप्रिय होती. विविध स्तरातील लोकांना त्यांनी आपल्या प्रवचन आणि भजनाद्वारे योग्य प्रबोधन, शिकवण आणि मार्गदर्शन दिले. संत रोहिदासांना भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले किंवा संबोधले जाते... बंगालमध्ये रुईदास, राजस्थान मध्ये रोहिदास, महाराष्ट्रानध्ये रविदास किंवा रोहिदास ,पंजाबमध्ये रैदास! संत रोहिदास यांचा मृत्यू १५२० मध्ये राजस्थान मधील उदयपूर जवळील चित्तोडगड येथे झाला. ज्याठिकाणी त्यांची पादत्राणे मिळाली त्याच ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ बांधण्यात आलेले आहे. चैत्र वद्य चतुर्दशी या दिवशी "संत रोहिदास पुण्यतिथी"  साजरी केली जाते व यादिवशी बरेच भाविक त्यांच्या समाधी स्थळाला भेट देतात

रोहिदास कथा १
रोहिदास कथा २
रोहिदास कथा ३
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते