सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री सेना न्हावी

Sena Navi Banner

परिचय

संत सेनाजी महाराज वारकरी संप्रदायातील एक मोठे विठ्ठल भक्त होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर या संतांचे ते समकालीन संत होते व पांडुरंगावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांचा जन्म अलाहाबाद जवळील बांधवगड येथे झाला होता. ते व्यवसायाने नाभिक होते व तेथील स्थानिक राजाकडे हजामती करण्याचे काम करीत असत. नित्यनेमाने कामे करत असतानाही ते मनाने सदैव विठ्ठलचिंतनात मग्न असत. ते बहुभाषिक होते. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील त्यांच्या अभंग रचना मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पंजाब धर्मियांच्या "गुरुग्रंथसाहेब" या पवित्र ग्रंथामध्ये त्यांच्या रचना आहेत तसेच संत जनाबाईसारख्या समकालीन संतांनी देखील त्यांचा उल्लेख  आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ते पुन्हा आपल्या जन्मभूमीकडे परतले मात्र पंढरपूरच्या पांडुरंगाचा ध्यास सतत त्यांना लागलेला असे. एके दिवशी आपल्या घरात एकादशीच्या दिवशी ते दिवसभर पांडुरंगाचे नामस्मरण करत चिंतन करीत बसले ...दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य द्वादशीला त्यांची समाधी लागली व ते अनंतात विलीन झाले. हा दिवस सेना महाराजांचा 'पुण्यतिथी दिवस' म्हणून पाळला जातो व आजही त्यांचा उल्लेख मोठ्या आदराने केला जातो. बांधवगड येथे आजही संत श्री सेना महाराजांचे स्मृतीठिकाण आहे तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर  महादेवाच्या मंदिरासमोर संत सेना न्हावी महाराज यांचे समाधी मंदिर आहे

सेना न्हावी कथा १
सेना न्हावी कथा २
सेना न्हावी कथा ३
सेना न्हावी कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते