सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत सखुबाई

Sakhubai Banner

परिचय

महाराष्ट्रातील एका ब्राम्हण कुटुंबामध्ये संत सखुबाईचा जन्म झाला होता. त्यांचे आई-वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते  व दोघेही विठ्ठलाचे परमभक्त होते. त्या दोघांमधला हा भक्तिभाव त्यांच्या या कन्येमध्ये देखील पुरेपूर उतरला होता.  विवाहयोग्य झाल्यावर कृष्णानदीकाठच्या कऱ्हाड मधील एका कुटुंबामध्ये सखुबाईचा विवाह झाला...परंतु सासर मात्र त्यांच्या स्वभावाच्या अगदी विपरीत मिळाले. सखुबाई जितक्या शांत ,सहनशील व धार्मिक होत्या तितक्याच त्यांच्या सासूबाई व पती कठोर स्वभावाचे होते. त्यांच्याकडून होणारी छळवणूक व जाच सखुबाई आपल्या वाट्याला आलेले भोग समजून सोसत होत्या .मात्र अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या मुखी सतत विठ्ठल नाम असे! एके दिवशी घरातल्यांना काहीही  न सांगता त्या दिंडीला गेल्या. सासूबाई आणि पतीला हे समजल्यावर त्यांना तिथून माघारी आणून मारझोड तर झालीच पण एका खोलीत त्यांना बंद करून उपाशी देखील ठेवले गेले. त्याही परिस्थितीत व्याकुळ होऊन त्या सतत  विठ्ठलनामाचा जप करीत होत्या व आर्ततेने  विठ्ठलाला आळवत होत्या. आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून  पंढरीनाथांना फार वाईट वाटले व त्यांनी रुक्मिणीला हा सगळा प्रकार सांगितला व स्रीरुप धारण करून थेट सखुबाईच्या खोलीत  त्यांनी प्रवेश केला.त्यांनी तिची सोडवणूक करून तिला पाणी पाजले  व स्वतःची ओळख 'पांडुरंगाची भक्त व वारकरी' म्हणून करून दिली. त्या स्त्रीमुळे सखुबाईना जरा दिलासा मिळाला व त्यांनी स्वतःच्या मनातली व्यथा तिच्याजवळ बोलून दाखवली. ते ऐकून ती वारकरी स्त्री तिला म्हणाली, तू पंढरीला जा; विठ्ठलाचे दर्शन घे ,इथे तुझ्या जागी मी थांबेन! सखुबाईना अतिशय आनंद झाला त्या तिथून निघून थेट पंढरपुरास गेल्या. आपल्या परमदैवताचे डोळेभरून दर्शन घेतल्यावर त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले. त्यांना ओळखणाऱ्या काही लोकांनी त्यांचे अंत्यसंस्कार पंढरपूरातच केले. इकडे सखुबाईंच्या जागी असणारे श्रीहरी सारे कष्ट, दुःख, यातना सोसत होते. सखुबाईंचे झालेले निधन आणि श्रीहरी मात्र आपल्या या भक्तापायी अडकून पडला आहे व सखुबाईंच्या घरातली सारी कामे निमूटपणे करीत आहे, हे पाहून रुक्मिणी मात्र अस्वस्थ झाली व तिने सखुबाईंची रक्षा व अस्थी एकत्र करून त्यात प्राण फुंकले व सखुबाईंना स्वतःच्या घरी पाठवून दिले. त्याचवेळी सखुबाईंच्या निधनाची वार्ता घेऊन पंढरपुराहुन काही लोक आले मात्र घरामध्ये सखुबाईंना कामे करताना पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. इकडे गावामध्ये परतून आलेल्या सखुबाईनी पांडुरंगच्या वेषातील सखुला पाहिले आणि आपल्यासाठी प्रत्यक्ष आपला देव इतके कष्ट उपसतो आहे, हे पाहून सखुबाई भारावून गेल्या व तेथील उपस्थित लोकांना त्यांनी आजवर घडलेला सारा वृतांत सांगितला. आपल्या परमभक्ताकरिता प्रत्यक्ष देवाने घेतलेले कष्ट व मानवरूपात त्याला झालेल्या यातना पाहून सर्वजण देवापुढे नतमस्तक झाले... सखुबाईंच्या सासूबाई आणि पती मात्र हे सारं पाहून शरमून गेले आणि आपल्या हातून घडलेल्या या पातकासाठी त्यांनी सखूबाईची क्षमा मागितली व विठ्ठलाच्या समोर लीन झाले

सखुबाई कथा १
सखुबाई कथा २
सखुबाई कथा ३
सखुबाई कथा ४
Scroll to Top

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते