सोलापूर वनविभाग
Menu
संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वात ज्येष्ठ संत होते तसेच ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन देखील होते. त्यांनी अनेक अभंग रचना केल्या आहेत. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.
एके दिवशी गोरा कुंभार पायाने चिखल तुडवीत होते व देहभान विसरून अखंडपणे अभंग म्हणत होते. त्याचवेळी त्यांचे छोटे बाळ रांगत रांगत त्यांच्याकडे आले व त्यांच्या पायाला मिठी मारू लागले मात्र विठ्ठलनामात प्रचंड तल्लीन असणाऱ्या गोरा कुंभाराना त्याक्षणी ना त्या बाळाचा स्पर्श जाणवला, ना बाळ आपल्या पायाशी असल्याची जाणीव झाली. ते त्याच तल्लीन अवस्थेत व मुखाने विठ्ठलनाम जपत चिखल तुडवीत राहिले व पुढच्याच क्षणी ते बाळ चिखलात पडले व आपल्या पित्याच्या पायाखाली आले ....आणि गोरा कुंभार चिखल समजून त्या बाळालाही तुडवीत राहिले.. व्हायचा तोच परिणाम झाला....त्या तुडवण्याने त्या बाळाचा प्राण गेला व त्याचे रक्त-मांस-हाडे त्या चिखलांमध्ये मातीप्रमाणे मिसळली गेली... आपल्या भक्तीत लीन असलेल्या गोरोबांना तरीही भान आले नाही. त्याचवेळी पाणी भरायला गेलेली त्यांची पत्नी संती घरी आली व बाळ कुठंच दिसेना म्हणून बैचेन होऊन सगळीकडे ती शोधू लागली. तेवढ्यात तिचे लक्ष गोरोबां तुडवीत असलेला चिखलाकडे गेले...सगळा चिखल रक्ताने लाल झाला होता व त्यात बाळाचे अवशेषही दिसत होते. क्षणात झाला प्रकार संतीच्या लक्षात आला व तिने काळजाचा ठाव घेणारा टाहो फोडला.. ती आक्रोश करता करता नवऱ्याला दूषणे देऊ लागली
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात.
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो
याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो
याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते