सोलापूर वनविभाग
Menu
पंढरपूरातच राहणाऱ्या आपल्या या भक्ताला भेटायला एकदा प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आले व दारासमोरच उभे राहिले त्यावेळी पुंडलिक आपल्या माता-पित्याची सेवा करीत होते. त्यांची सेवा अर्धवट टाकून ते उठू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी तिथेच पडलेली एक वीट घेऊन ती विठुरायाच्या दिशेने हळुवारपणे भिरकावली व आपण करत असलेली मात्या-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या विटेवरच उभं राहण्याची विनवणी केली. विठुराया देखील आपल्या या भक्ताच्या विनवणीला मान देऊन, आपल्या कंबरेवर दोन्ही हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. पंढरपूरच्या मंदिरामध्ये मूर्तीरूपात विठोबा आजही असाच उभा आहे असे मानले जाते.
स्कंदपुराणानुसार एक आख्यायिका अशी आहे की.... महाभारतकालामध्ये एकदा द्वारकेत श्रीकृष्णाला भेटायला राधा आली व या भेटीदरम्यान ती त्याच्या मांडीवर बसली. हे दृश्य रुक्मिणीच्या नजरेस पडताच ती खूप संतापली व नाराज होऊन द्वारकेतून निघून दिंडीरवनात म्हणजेच पंढरपुरात येऊन बसली. तिचा रुसवा दूर करण्याकरिता श्रीकृष्ण देखील मागोमाग त्याठिकाणी आले व तिची समजूत काढून तिला आपल्या सोबत द्वारकेस घेऊन निघाले. यादरम्यान त्यांना दिंडीरवनात राहणाऱ्या मातृपितृभक्त पुंडलिकाचे घर दिसले व आपल्या या भक्ताच्या भेटीसाठी देव प्रत्यक्ष त्याच्या दारी गेले. त्यावेळी पुंडलिक आपल्या माता-पित्याची सेवा करीत होते. देव आपल्या दारात आपल्या भेटीस आल्याचा त्यांना आनंद झाला मात्र माता-पित्याची सेवा अर्धवट टाकुन उठणे त्यांना शक्य नसल्याने व देव दारातच ताटकळत उभा राहू नये म्हणून आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाकडे हळुवारपणे भिरकावली व त्यावर उभे राहण्याची विनंती केली. भक्ताच्या या विनवणीचा मान राखून श्रीकृष्ण आपल्या कंबरेवर दोन्ही हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. त्यांच्यामागोमाग रुक्मिणी देखील येऊन उभी राहिली. त्या दोघांच्या या अनुपम सगुणरूपाचे दर्शन पुंडलिक, त्यांचे मातापिता व दिंडीरवनातील समस्त भक्तांनी घेतले व पुंडलिकांनी देवांकडे वर मागितला की,त्यांनी भक्तांसाठी कायम इथेच दिंडीरवनात निवास करावा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की लवकरच माझा श्रीकृष्णावतार समाप्त होईल व कलियुगाचा प्रारंभ होईल तेव्हा मी, रुक्मिणी, राधा व सत्यभामेसह याठिकाणी गुप्तपणे मूर्तीरूपात वास करू! त्यानंतर श्रीकृष्णाने ब्रह्मदेवांना बोलावले व त्यांच्याकडून विटेवर उभ्या असलेल्या आपल्या व रुक्मिणीच्या या सगुणरूपाच्या मूर्तीरूप घडवून घेतल्या व पुंडलिकास त्या भेट म्हणून दिल्या. आजही पंढरपूरात याच मूर्ती पाहावयास मिळतात. सर्वांना आपले दर्शन व आशीर्वाद देऊन श्रीकृष्ण रुक्मिणीसह द्वारकेस गेले. पुढे काही काळानंतर श्रीकृष्णावतार समाप्ती झाली व कलियुगाचा प्रारंभ झाला.ही वार्ता जेव्हा पुंडलिकाच्या कानी पडली तेव्हा त्यांना शोक अनावर झाला. तेव्हा पंढरपूरात मूर्तीरूपात असणाऱ्या विठ्ठलाने त्यांना दर्शन देत हा दिलासा दिला की ,मी शरीररूपाने जरी संपलो आहे तरी या मूर्तीरुपात मी आहे,मी सर्वत्र आहे ,मी चराचरात व्यापलेलो आहे ,माझ्या सर्व भक्तांसाठी मी इथे उभा आहे व असणार आहे! विठ्ठलाच्या कृपेची प्रचिती सर्व भाविक-भक्तांना वेळोवेळी येत राहिली व त्याच्या दर्शनाचा लाभ देखील होत राहिला. पुढे भक्त पुंडलिकांनी स्वतःला विठुरायाच्या सेवेमध्ये वाहून घेतले व पुंडलिकमुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. काही काळानंतर पुंडलिकमुनी यांनी माघ शुद्ध दशमी यादिवशी चंद्रभागा नदीकाठी संजीवनी समाधी घेतली. तेथेच आता त्यांचे पुंडलिक मंदिर आहे. भाविक मंडळी जेव्हा पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनास येत तेव्हा आवर्जून या मंदिरास भेट देत व पुंडलिकमहाराजांना आपले गाऱ्हाणे सांगत किंवा नवस बोलत असत. भक्तांना या मंदिरातून अतिशय सकारात्मक प्रचिती येत असे..त्यामुळे पुंडलिकमहाराजांची महती वाढली व पुढे दिंडीरवनास 'पुंडलिकपूर' असेही संबीधले जाऊ लागले. तेच पुढे 'पांडुरंगपूर' म्हणूनही ओळखले जाऊ लागले. इथली माती पांढरीशुभ्र असल्याने 'पांढरीपूर' म्हणूनही ओळखले जाऊ लागले व हेच पुढे 'पंढरपूर' झाले
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात.
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो
याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो
याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते