Azadi Ka Mahotsav Logo
Maharashtra Forest Department Logo

सोलापूर वनविभाग

तुळशी वृंदावन

संत श्री सोपानदेव

Sopandev Banner

परिचय

विठ्ठलाचे परमभक्त असणाऱ्या रुक्मिणी व विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या चार अपत्यांपैकी सोपानदेव हे तिसरे अपत्य!.श्री सोपानदेवांचा जन्म शके ११९९, ईश्वरनाम संवत्सर, कार्तिक शुद्ध पौर्णिमा, रविवार रोजी सन १२७७ मध्ये झाला. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपानदेव ही भावंडे अगदी लहान वयात असताना त्यांच्या मातापित्यानी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात ही भावंडे कायम एकमेकांच्या सहवासात राहिली आणि वाट्याला आलेले प्रत्येक भोग, हालअपेष्टा व अपमान सर्वांनी मिळून सहन केले. पैठणहुन शुद्धीपत्रक आणणे, माधुकरी मागणे, कुठलाही प्रवास करणे या साऱ्या गोष्टीमध्ये ते सदैव एकसाथ आणि एकसंध असत. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यांनंतर ही घडी विस्कटली आणि सारा आनंद हरपल्या सारखा झाला. ज्ञानदेवांच्या प्रयाणानंतर आपणही या जगाचा निरोप घ्यावा असे या भावंडाना वाटू लागले व सर्वात आधी हा विचार सोपानदेवांनी बोलून दाखवला. ज्ञानेश्वर महाराजांचा आधार गेल्याने व विरक्ती वाटू लागल्याने सोपानदेव यांनी ज्ञानदेवांच्या  संजीवन समाधी सोहळ्याच्या अवघ्या महिन्याभरात म्हणजेच मार्गशीर्ष वद्य १३ शके १२१८ म्हणजेच सन १२९६ मध्ये सासवड येथे समाधी घेतली

सोपानदेव कथा १
सोपानदेव कथा २
सोपानदेव कथा ३
सोपानदेव कथा ४
Scroll to Top
Pudina Tulas

बेसील तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात. 

Pudina Tulas

पुदिना तुळस

स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो

Lemon Tulas

लेमन तुळस

याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो

Hanuman Tulas

हनुमान तुळस

याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.

Sabja Tulas

सब्जा तुळस

आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो

Vaijayant Tulas

वैजयंती तुळस

अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे

Krishna Tulas

कृष्ण तुळस

या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो

Ram Tulas

राम तुळस

राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे.  याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते