सोलापूर वनविभाग
Menu
इ स पंधराव्या शतकामध्ये पंढरपूरपासून जवळच असणाऱ्या मंगळवेढा या गावी कान्होपात्रा यांचा जन्म झाला. त्या विठ्ठलाच्या परमभक्त होत्या व वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत कवयित्री देखील होत्या. मंगळवेढा येथील रूपवान व धनवान गणिका शामा हिची कान्होपात्रा एकुलती एक कन्या! नृत्य, गायन व सौंदर्याने रिझवणे अशा विपरीत व्यवसायात असूनही कान्होपात्रा मात्र सतत आपल्या आराध्य दैवताचे म्हणजेच विठ्ठलाचे नामस्मरण करीत असे. गणिका व्यवसायातील स्त्री असल्याने त्यांना कुणी गुरू लाभणे शक्यच नव्हते. कान्होपात्रा यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांनी बऱ्याच अभंगरचना केल्या असाव्यात पण त्या लिहून ठेवायला देखील कुणी नसावं असा अंदाज आहे व त्यामुळेच सध्या त्यांचे अगदी अल्प प्रमाणात काव्य उपलब्ध आहे. त्यांच्या प्रत्येक अभंग रचना या भक्तीरसपूर्ण तर आहेतच पण ह्रदयाला अतिशय भिडणाऱ्या आहेत. बिदरच्या बादशहाने कान्होपात्राला मागणी घातल्याने त्यांनी विठ्ठलाच्या चरणांवर माथा टेकवून आपले प्राण सोडले
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात.
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो
याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो
याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते