सोलापूर वनविभाग
Menu
अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होते. श्री बंडोपंत व मंजुळाबाई हे त्यांचे आई-वडील! तुकडोजी महाराज यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी त्यांचे माणिक हे नाव बदलून "तुकडोजी" हे नाव त्यांना दिले. तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा व जातीभेद निर्मूलनासाठी तसेच समाज प्रबोधनासाठी आपली भजने ,भाषणे ,पोवाडे ,काव्य व कीर्तनांचा अतिशय प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हे त्यांचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भजन होते. ग्रामविकास व ग्रामोन्नती यासाठी ते अधिक प्रयत्नशील असत. गावाचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास देखील होतोच हे त्यांचे सांगणे होते. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरांवर कार्य केले. २८ ऑगस्ट १९४२ मध्ये स्वातंत्र्य संग्राम चळवळीमध्ये भाग घेतल्याने त्यांना अटकही झाली व डिसेंबर मध्ये त्यांची सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतिनाम सप्ताह केला. ५ एप्रिल १९४३ रोजी गुरुदेव मुद्रणालयाची स्थापना करून ‘गुरुदेव’ मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोव्हेंबर १९४३ मध्ये अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. सर्वसामान्य लोकांकरिता हरिभजन व कीर्तनांसाठी मंदिरे खुली केली. बंगाल येथील दुष्काळ ,चीन युद्ध ,पाकिस्तान युद्ध ,कोयना भूकंप यासारख्या राष्ट्रीय पातळीवर आलेल्या आपत्तीमध्ये सेवाकार्ये करण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. १९ मार्च १९५६ मध्ये त्यांनी अमरावती येथील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. तुकडोजी महाराज यांनी मराठी व हिंदी भाषेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती केली , ग्रामगीता; अनुभवसागर;भजनावली; सेवास्वधर्म; राष्ट्रीय भजनावली इ पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंधश्रद्धा,जातीभेद निर्मूलन व ग्रामविकास यांच्यासाठी त्यांनी केलेले कार्य व त्यासाठी अभंग ,पोवाडे ,काव्य व खंजिरी भजने यांचा प्रबोधनासाठी केलेला वापर पाहून त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी "राष्ट्रसंत"ही पदवी बहाल केली. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी तुकडोजी महाराज यांचे निर्वाण झाले. त्यांच्या सन्मानार्थ नागपूर विद्यापीठाला ' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ' असे नाव बहाल करण्यात आले
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात.
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो
याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो
याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते