सोलापूर वनविभाग
Menu
सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात असणाऱ्या नरसी-बामणी येथील शिंपीकाम करणारे दामाशेटी रेळेकर व त्यांच्या पत्नी गोणाई यांच्या घरी नामदेवांचा जन्म झाला....मात्र त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. मोठी बहीण आऊबाई, पत्नी राजाई, चार मुले नारा, विठा, गोंदा, म्हादा व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचे नाव मोठ्या आदरपूर्वक घेतले जाते त्या जनाबाई यादेखील त्यांच्या परिवाराच्या सदस्य होत्या. त्या स्वतःला संत नामदेवांची दासी म्हणवून घेत. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत तसेच पहिले संतचरित्रकार व आत्मकथाकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी पंजाबी व व्रज भाषेमध्ये देखील काव्यरचना केल्या. पैकी ६५ काव्यरचना शीखधर्मोयांच्या पवित्र गुरुग्रंथसाहिब यामध्ये ‘गुरूबाणी’ या नावाने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पार पंजाबप्रांतापर्यंत नेणारे ते आद्य प्रचारक होते. पंढरपूरला येणारे भक्तगण व साधुसंत यांच्या पावलांचा स्पर्श व्हावा म्हणून मुख्य विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी प्रथम पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली..या पायरीलाच "नामदेवांची पायरी " असे आदरपूर्वक संबोधले जाते
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी याची पाने वापरली जातात.
स्वयंपाकात स्वाद आणि सुगंधासाठी वापरली जाणारी तुळस. याची उंची अतिशय कमी असते. याची पाने लहान व लंबगोलाकार असतात. पानांचा पृष्ठभाग हा थोडा खडबडीत असतो. पाने चुरल्यावर अतिशय सुंदर असा वास पसरतो
याची पाने देखील थोडी लांबट आकाराची असतात. मंद सुगंध असतो. पाने चूरल्यास लिंबासारखा वास येतो
याची पाने इतर तुळशींच्या मानाने लांब असतात. ही पाने चुरल्यास त्यांचा मारीगोल्डच्या फुलांसारखा वास येतो.
आपल्या येथे सब्जाचे झाड खास त्याच्या बियांसाठी लावले जाते. शरीराला थंडावा देणारा सब्जा उन्हाळ्यात महत्वाचा ठरतो. जागोजागी मिळणारा वर्ल्ड फेमस फालुदा, सब्जा शिवाय बनू शकत नाही. या तुळशीची पाने व बिया सरबतात घालून प्यायल्याने उष्णता कमी होते. विंचू दंशावर सब्जा तुळशीचा पाला चुरडून लावला जातो
अतिशय तीव्र असा सुवास असलेली ही तुळस विशेष औषधी आहे. याची फुले लाल रंगाची असतात. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणाऱ्या जखमांवरही हा पाला लावला जातो. जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीचे ‘रान तुळस’ असेही नाव आहे
या तुळशीचे खोड, पाने, व मंजिऱ्या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’, असेही संबोधले जाते. या तुळशीचे पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला, ताप यावर लवकर आराम मिळतो
राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. याची पाने पोपटी रंगाची असतात. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारांसाठी ही तुळस उपयुक्त आहे. या तुळशीला ‘लवंगी तुळस’, असेही संबोधले जाते