तुळशी वृंदावन
पंढरीची भक्तीपीठ म्हणून असलेली महती आणि पांडूरंगाचे तुळशीबरोबर असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा सुंदर मिलाफ करून या तुळशीच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या उद्यानात आठ प्रकारच्या तुळशींची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचसोबत प्रसिद्ध अशा आठ संतांच्या सुंदर अशा मुर्तींचीही स्थापना करण्यात आलेली आहे. उद्यानाच्या भिंतींवर सर्वपरिचीत अशा संतांची चित्रे व त्यांच्या आयुष्यातील घटना चितारण्यात आलेल्या आहेत. ही सर्व चित्रे आणि उद्यान्यातील म्युरल्स ही जे जे स्कुल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी चितारलेली आहेत. या चित्रांच्या माध्यमातून संतांच्या आयुष्यातील प्रेरणादायक आणि संदेश देणारे प्रसंग आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.